Festival Posters

Paris Olympics 2024:सात्विक-चिराग या भारतीय जोडीचा पुरुष दुहेरीचा सामना रद्द

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (14:48 IST)
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा भारतीय पुरुष दुहेरी सामना रद्द करण्याचा निर्णय सोमवारी अखेरच्या क्षणी घेण्यात आला. सात्विक-चिरागचा सामना क गटात मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल या जोडीशी होणार होता, परंतु जर्मन खेळाडू लॅम्सफसने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सामना रद्द करण्यात आला. 

सात्विक आणि चिरागने शनिवारी लुकास कॉर्वी आणि रोनन लाबर या फ्रेंच जोडीवर 21-17, 21-14 असा विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या भारतीय जोडीचा मंगळवारी गटातील अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो यांच्याशी सामना होईल.

जर्मन पुरुष दुहेरी खेळाडू मार्क लॅम्सफसने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे, असे बॅडमिंटन जागतिक महासंघाने (BWF) सांगितले.  लैम्सफस आणि त्याचा साथीदार  मार्विन सेडेल चे भारताच्या सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि फ्रान्सचे लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (30 जुलै, 2024) यांच्या विरुद्ध C गटातील सामने यापुढे खेळवले जाणार नाहीत. 
Edited By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप

अजित पवारांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी, सुनील तटकरे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली

मंत्री नरहरी झिरवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न! मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; तृतीयपंथी व्यक्तीच्या भावावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments