Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चेन्नईत आनंदोत्सव

भाषा
सोमवार, 23 फेब्रुवारी 2009 (14:45 IST)
' अँड ऑस्कर गोज टू ए. आर. रहमान' असे शब्द ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर होताच, इकडे चेन्नईत दुसर्‍यांदा दिवाळी साजरी झाली. फटाक्यांच्या लडी ऑस्करची द्वाही फिरवू लागल्या. तर रहमानच्या चाहत्यांनी शहरभर मिठाई वाटली. त्याच्या घराभोवती तर आनंदोत्सवच सुरू होता.

चेन्नईत कोडांबक्कम येथे रहमानच्या घरासमोर प्रचंड मोठा केक ठेवण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्याचे कळताच रहमानच्या कुटुंबियांनी तो केक कापला. यावेळी मोठी फटाक्यांची माळ फोडण्यात आली. कॉलेजच्या युवकांनीही शहरभर रहमानच्या ऑस्करचे सेलिब्रेशन सुरू केले. सगळीकडे मिठाई वाटली जात होती. केक कापले होते. 'टॉलीवूड'मधील कलावंतांनीही रहमानने 'हॉलीवूड'मध्ये कमावलेल्या यशाला सलाम केला.

रहमानची बहिण रहात असलेल्या विरूगमबक्कम भागातही असाच आनंदोत्स व साजरा झाला. मी त्याचे नाव कधी जाहीर होईल, याच्या प्रतीक्षेत होते. त्याच्यासाठी मी देवाकडे प्रार्थनाही केली होती, असे रहमानची बहिण रेहाना यांनी सांगितले. रहमानने तिथ जाऊन तमिळमध्ये बोलावे अशी माझी अपेक्षा होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने ती पुरी केली याचा आनंद आहे, असेही रेहाना म्हणाल्या.
सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

नीमराणा किल्ला पॅलेस अलवर राजस्थान

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

एकता कपूरच्या वकिलाने बजावली नोटीस, 100 कोटींच्या मानहानीची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

Show comments