Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे घडण करण्यासाठी हे करा

Webdunia
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (18:52 IST)
आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःला हुशार दिसण्यासाठी काही गोष्टींना आपल्या आयुष्यात समाविष्ट करावे लागते. या गोष्टी आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतात आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे  विकास करतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन यश मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे टिप्स.  
 
1 स्वतःला ओळखा-
या साठी स्वतःवर लक्ष देणं, स्वतःला ओळखले पाहिजे. स्वतःचे सामर्थ्य  आणि स्वतःचा कमकुवत पणा ओळखा स्वतःचे आत्म विश्लेषण करा. आपल्यातील गुणआणि दोषांचे विश्लेषण करा.कोणतेही नवीन काम करताना संकोच करू नका. स्वतःवर प्रयोग करत राहा. 
 
2 सकारात्मक दृष्टिकोन ठेवा-
एक आकर्षक व्यक्तिमत्त्व मिळविण्यासाठी आपल्या विचारसरणी आणि दृष्टिकोनात सकारात्मकता असणे महत्त्वाचे आहेत. आपण जे काही विचार करतो त्याचा परिणाम आपल्या कृतीवर होतो.सकारात्मक विचारसरणी असेल तर आत्मविश्वास वाढेल या मुळे व्यक्तिमत्त्वात चांगला परिणाम होईल. आयुष्यात चढ-उतार होतात पण सकारात्मक विचारसरणी मुळे आयुष्यात पुढे वाढायला बळ मिळते.
 
3 स्वतःचे विचार  ठेवा- 
आपली स्वतःची स्वतंत्र विचारसरणी असावी आणि ती लोकांपुढे ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. या मुळे आपले संभाषण मनोरंजकच बनत नाही तर लोक आपल्याकडे लक्ष देतात. म्हणून आपले विचार दुसऱ्यांसमोर ठेवायला संकोच करू नका. आपल्या सभोवतालाच्या गोष्टींची माहिती ठेवा. 
 
4 नवीन लोकांशी संपर्क ठेवा-     
नवीन आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी संपर्क ठेवा. या मुळे आपल्याला नवीन काही शिकायला मिळेल. इतरांच्या संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्याची संधी मिळते आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.
 
5 अधिक वाचा आणि नवीन स्वारस्ये विकसित करा- 
ज्यांना कामात स्वारस्य आहे त्यांच्या कडे बोलण्यासारखे काही नसते. वाचून आपण आपल्या ज्ञानाला विकसित करू शकता. या मुळे एखाद्याशी संभाषण करताना काय बोलावं असे होणार नाही. म्हणून वाचन करून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. या मुळे आपण आपले ज्ञान आणि स्वारस्ये सामायिक करून चांगले संभाषण करू शकता. 
 
6  चांगले श्रोता व्हा-  
बरेच लोक कोणत्याही गोष्टींना समजून घेण्यासाठी ऐकत नाही, तर चांगले प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकतात.चांगले श्रोता बनून आपल्या व्यक्तिमत्त्वात मोठा फरक पडतो.परंतु आपण ह्याला अधिक महत्त्व देत नाही जेव्हा कोणी आपल्याशी बोलतो तेव्हा त्याच्या कडे संपूर्ण लक्ष द्या त्याचे म्हणणे एकूण घ्या आणि थेट त्याच्या डोळ्यात बघा. सभोवतालाचे वातावरण शांत असावे तरच आपण लोकांना समजून घेण्यात सक्षम असाल आणि चांगला व्यवहार करू शकाल. 
  
 7 आनंदी राहा- 
नेहमी हसतमुख आणि आनंदी राहा जेव्हा आपण लोकांना भेटाल हसतमुख भेटा, असं केल्यानं आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगली भर पडेल. नेहमी आतून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
 
8 नम्र व्हा- 
नम्र व्हा या मुळे लोक आपला आदर करतील.इतरांना मदत करा. चांगले काम केल्यानं इतरांचा दिवस चांगला होईल आणि आपली चांगली प्रतिमा देखील बनेल. या मुळे आपला व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास होईल. 
 
9  बॉडी लँग्वेज वर लक्ष द्या- 
बॉडी लँग्वेज आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.हे आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाला दर्शविते. आपण कसे बोलता, कसे चालता, खाणे-पिणे या सर्व गोष्टींना बघून लोक आपल्या स्वभावाचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतात. चांगल्या बॉडी लँग्वेज मुळे आपल्या व्यक्तिमत्त्वावर चांगला प्रभाव पडतो. चालताना खांदे सरळ ठेवा.सरळ बसा,बोलताना नेहमी समोरच्याच्या डोळ्यात बघून संभाषण करा.    
 
10 आपल्या आउटलुक कडे लक्ष द्या- 
आपण कसे कपडे परिधान करता या वर आपली छवी बनते. आपले कपडे व्यवस्थित असतील तर आत्मविश्वास येतो.शरीरावर टेटू बनवू नका. चांगले इस्त्री केलेले कपडे आपल्या व्यक्तिमत्त्वाला सादरीकरणाच्या योग्य बनवतात. 
 
11 आत्मविश्वास बाळगा -
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासी असणे महत्त्वाचे आहे, आपण जे काम करता त्यासाठी आत्मविश्वास बाळगा. आपल्या क्षमतेवर शंका घेऊ नका. आपल्या मधील कमकुवतपणा ओळखून त्यांना दूर करण्याचा  प्रयत्न करा. या मुळे आपल्याला आत्मविश्वास मिळेल. प्रेरक विचारांची पुस्तके किंवा प्रोत्साहन देणारी पुस्तके वाचा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम ठेवा.व्यक्तिमत्त्वाच्या घडण मध्ये आत्मविश्वासाची महत्त्वाची आणि मुख्य भूमिका आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments