Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंग्रजी शिकण्याची सोपी पध्दत

Webdunia
कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्‍याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो.

भाषा शिकण्याचे वातावरण-
इंग्रजी भाषा आपली मातृभाषा अथवा बोलीभाषा नाही. त्यामुळे ती आत्मसात करण्‍यासाठी मातृभाषा शिकण्‍याचे वातावरण मिळू शकत नाही. मात्र, काही प्रमाणात तरी तसे वातावरण निर्माण करता येते. दहावीपर्यंत मातृभाषेचा पाया पक्का झाल्यानंतर आणि इंग्रजीची चांगली ओळख करून घेतल्यानंतर पुढची पायरी म्हणजे अशा कॉलेजची निवड केली पाहिजे की, तेथे सगळे विषय इंग्रजी भाषेत शिकवले जातात. त्यामुळे इंग्रजी भाषा कानावर वारंवार पडेल. शाळेत येण्यापूर्वी टीव्हीवर इंग्रजी भाषेतील कार्यक्रम अधिकाधिक बघावे किंवा ऐकावे.

याच प्रकारे रेडियोवर इंग्रजी बातम्या व इंग्रजी भाषेतील कार्यक्रम ऐकावे. कुठलीही भाषा शिकायची असल्यास ती जास्तीत जास्त ऐकणे, ही भाषा शिकण्याची पहिली पा‍यरी आहे. मराठी बातम्या, त्यानंतर हिंदी समाचार व त्यानंतर इंग्रजी न्यूज दूरदर्शनवर येत असतात. त्यामुळे इंग्रजी भाषा समजण्यास सोपी जाते.

ऐकलेले वाक्य स्वत: बोलण्याचा सराव-
सगळ्यात आधी संदर्भ दृश्यावरून बहुतेक गोष्टी कळून जातात. ऐकलेली लहान लहान वाक्ये आपण स्वत: तयार करून त्याची एक टिप्पणी तयार करून त्याचे पाठांतर करावे. टिप्पणीतील नावाच्या जागी आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे टाकून आपण स्वत: अधिक वाक्ये तयार करून ती लिहू, बोलू शकतो. इतर भाषांप्रमाणे इंग्रजी भाषा आधी बोलणे, त्यानंतर लिहिणे व मग वाचणे शिकले पाहिजे.

आपल्या मित्र मंडळीत किंवा आपल्या भाऊ बहिणींशी बोलताना आपण इंग्रजीत बोलण्याचा सराव केला पाहिजे. सुरूवातीला बोलताना चुका होतील. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

भाषेतील शब्दसंपत्ती वाढवा-
भाषा ही अक्षर, शब्द व वाक्यांनी बनली आहे. मात्र, अक्षरानी बनलेल्या शब्दाना व शब्दांपासून बनलेल्या वाक्यांच्या योग्य त्या समन्वयाने भाषा बनत असते. कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग किंवा अर्थ पाठ करून घेणे पुरेसे नाही. तर त्याचा योग्य संदर्भासहीत वाक्यात उपयोगही करता आला पाहिजे. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी शब्दकोष जवळ असणे आवश्यक आहे.

काही शब्द चमत्कारीक असतात. त्यांचा अर्थ वाक्यानुरूप अथवा स्थळानुरूप बदलत असतो. त्यामुळे त्या शब्दाचे वाक्यात रूपांतर करणे आधी शिकले पाहिजे. शब्द भांडार वाढवल्याने भाषा शिकणे अधिक सोपे जाते.

व्याकरणाची मदत-
व्याकरण शिकल्यानंतरच भाषा शिकली जाते, असे नाही. लहानपणापासून बोलत असलेली मातृभाषा शिकताना कुठे आपण आधी व्याकरण शिकलो होतो. इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरणाची मदत होत असते. इंग्रजी बोलताना आपण हळूहळू व्याकरणाचाही अभ्यास करता येऊ शकतो.

ऐकणे व बोलणे शिकल्यानंतर लिहिणे-वाचणे शिकावे-
भाषा ही मुख्यत: बोलण्यासाठी असते. परंतु, आपण ती ‍लिहिण्यासाठी व लिहिलेले वाचण्याची कला आत्मसात करून घेतली आहे. प्रत्येक भाषा बोलण्याचे एक विशिष्ट प्रकारचे तंत्र असते. त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्याचे तंत्र आहे. परंतु, इंग्रजी शिकत असताना मातृभाषाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments