Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायचुंग भूतिया

वेबदुनिया
नाव : बायचुंग भूतिया
जन्म : १५ डिसेंबर १९७६
जन्म ठिकाण : सिक्कीम
देश : भारत
खेळ : फुटबॉल
व्यवसायिक पदार्पण : २०० ३

क्रिकेटप्रेमी भारतात दुसर्‍या खेळाला फारशी प्रसिध्दी मिळत नाही. त्यामुळे इतर खेळातील खेळाडू लोकांसमोर येत नाहीत. फुटबॉलपटू बायचुंग भूतिया अशांपैकीच एक. फुटबॉलमध्ये तो भारताचा सचिन तेंडुलकर आहे, असे म्हटले तरी चालेल.

सेंट झेव्हियर्समध्ये शालेय शिक्षण घेत असताना त्याला शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून तो गंगटोक येथे फुटबॉल शिकण्यासाठी गेला. त्यानंतर तो अनेक क्लबकडून फुटबॉल खेळला. १९९३ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी फुटबॉल खेळण्यासाठी त्याने शाळा सोडली. तो कोलकत्यातील इस्ट बंगाल क्लबकडून खेळू लागला.

१९९५ मध्ये तो जेसीटी मिल्सकडून खेळू लागला व त्याने त्या क्लबला भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्या स्पर्धेत त्याने सर्वांत जास्त गोल केले होते. १९९६ मध्ये त्याला सर्वोत्तम भारतीय खेळाडूचा पुरस्कार ‍मिळाला. १९९७ मध्ये तो पुन्हा इस्ट बंगल क्लबमध्ये आला.

१९९८-९९ मध्ये तो त्या क्लबचा कर्णधार झाला. १९९९ मध्ये तो परदेशात गेला. २००२ मध्ये तो परत भारतात आला आणि मोहन बागान क्लबकडून खेळू लागला. त्यांना आशियाई करंडक जिंकून देण्यात मदत केली. त्याच्या नावाने सिक्कीममध्ये बायचुंग स्टेडीयम बांधले आहे. भारतीय फुटबॉलपटूंचा तो रोल मॉडेल आहे.

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

Show comments