Festival Posters

स्त्रिया कशा बनतात नागा साध्वी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही गोष्टी

Webdunia
सोमवार, 14 जानेवारी 2019 (12:38 IST)
आखाड्याशी संबंधित महिला साधव्यांना महिला नागा साधवी म्हटले जाते. पुरुष नागा साधूप्रमाणे महिला साधव्यांसाठी देखील आखाड्यांमध्ये काही नियम बनवले आहे, ज्याचे पालन करणे गरजेचे असते. येथे महिला नागा साधव्यांशी निगडित खास गोष्टी ...
 
साधवी बनण्याअगोदर महिलेला 6 ते 12 वर्षांपर्यंत कठिण ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. यानंतर गुरू जर संतुष्ट होतात की महिला ब्रह्मचर्याचे पालन करू शकते तेव्हा तिला दीक्षा दिली जाते.
 
महिला नागा साधवी बनण्याअगोदर आधी आखाड्यांचे साधू-संत स्त्रीचे घर परिवार आणि मागच्या जीवनाची चौकशी करतात.  
महिला नागा साधवी कपाळावर तिळक आणि फक्त एक चोला धारण करतात. मुख्यकरून हा चोला भगवा रंगाचा किंवा पांढर्‍या रंगाचा असतो.
 
महिलेला देखील नागा साधवी बनण्याअगोदर साधवी :चे पिंडदान आणि तर्पण करावे लागते. 
 
साधवी बनण्याअगोदर महिलेला हे सिद्ध करावे लागते की तिचा परिवार आणि समाजाबद्दल कुठल्याही प्रकारच मोह नाही आहे. तिला फक्त देवाची भक्ती करायची आहे. या गोष्टीचे समाधान झाल्यानंतर गुरू संन्यासाची दीक्षा देतात.
ज्या आखाड्याहून महिला संन्यासाची दीक्षा घेण्यास इच्छुक असते, त्याचे आचार्य महामंडलेश्वरच तिला दीक्षा देतात. 
 
महिला जेव्हा नागा साधवी बनते त्या अगोदर तिचे आधी मुंडन केले जाते आणि तिला नदीत स्नान करवतात.
महिला नागा साधव्या संपूर्ण दिवस देवाचा जप करते. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तिला उठावे लागते. त्यानंतर नित्य कर्म केल्यानंतर महादेवाचा जप करते. दुपारी भोजन करते आणि नंतर परत महादेवाचा जप करते. सायंकाळी दत्तात्रेयाची पूजा करते आणि नंतर शयन. 
 
सिंहस्थात नागा साधूंसोबत महिला साधव्या देखील शाही स्नान करते. आखाड्यात साधव्यांना भरपूर सन्मान दिला जातो. 
जेव्हा महिला नागा साधवी बनते तेव्हा तिला आखाड्याचे साधू संत यांना माता म्हणून संबोधतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

Vasant Panchami 2026 वसंत पंचमीचा उत्सव कधी साजरा केला जाईल?

दशरथकृत शनी स्तोत्राने समस्या होतील दूर, मिळेल शनिदोषापासून मुक्ती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments