सध्या प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत करंट अफेयर्स किंवा चालू घडामोडी संबंधित एक भाग आहे, या मध्ये कमी वेळात चांगले गुण मिळवू शकतो. या मध्ये असलेले प्रश्न सोडविण्यासाठी कमी वेळ लागतो. करंट अफेयर्सच्या तयारीसाठी सर्व विद्यार्थी नवी नवी पद्धत अवलंबवतात तरीही यश मिळणे अवघड होते.करंट अफेयर्सची तयारी कशी करावी जाणून घ्या.
करंट अफेयर्स ची तयारी कशी करावी या साठी काही टिप्स
1 वर्तमान पत्राच्या माध्यमाने - करंट अफेयर्स च्या तयारी साठी वर्तमानपत्र चांगले माध्यम आहे. या माध्यमातून देशात घडणाऱ्या घडामोडीची माहिती मिळते. या साठी आपण इंग्रजी वर्तमानपत्राची मदत घेऊ शकता.
2 टीव्ही च्या माध्यमातून- आपण टीव्ही च्या माध्यमातून राज्यसभा टीव्ही, लोकसभा टीव्ही आणि डीडी न्यूज चे करंट अफेयर्स संबंधित कार्यक्रम देखील बघू शकता.
3 इंटरनेट च्या माध्यमातून-सध्या इंटरनेटचे फार महत्त्व आहे. कोणत्याही क्षेत्रात इंटरनेटचे योगदान आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तर इंटरनेटचा वापर अधिक प्रमाणात होतो.अशा परिस्थितीत आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करताना इंटरनेट ची मदत घेऊ शकता. इंटरनेटवर बऱ्याच वेबसाईट आहेत ज्याद्वारे आपण डेली करंट अफेयर्स ची माहिती घेऊ शकता.
4 सोशल ,मीडियाच्या माध्यमातून - आपण सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनसाठीच नव्हे तर शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी देखील करू शकता.
5 न्यूज अप्लिकेशन सब्सक्राइबच्या माध्यमातून - आपण करंट अफेयर्सची माहिती घेण्यासाठी काही न्यूज अप्लिकेशन देखील डाउनलोड करून करंट अफेयर्सची माहिती मिळवू शकता. हे कोणत्या ही स्पर्धात्मक परीक्षेसाठी कामी येतील.