Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:08 IST)
सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणा-‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशेष न्यायाधीश के.के.जहागीरदारयांनी हा आदेश पुणे जिल्हा कोर्टाने  दिला.
 
लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला. याबाबत पिडीतेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. सरकार पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे (Arundhati Brahma) यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले.गुन्ह्यात पिडीत मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) यांनी केला.पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव (Satish Jadhav) यांनी कामकाज पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पिडीतेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

घटनेच्या दिवशी पिडीता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती.यावेळी, ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली.यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास 5 वर्षे सक्तमजुरी
 सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणा-‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदारयांनी हा आदेश पुणे जिल्हा कोर्टाने  दिला.
 
लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला. याबाबत पिडीतेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. सरकार पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे (Arundhati Brahma) यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले. गुन्ह्यात पिडीत मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव (Satish Jadhav) यांनी कामकाज पाहिले. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पिडीतेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. घटनेच्या दिवशी पिडीता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती. यावेळी, ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी अधिकारी परमबीर सिंग यांच्या विरोधात वॉरंट जारी