Marathi Biodata Maker

येरवडामध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू; 8 कामगार गंभीर जखमी

Webdunia
शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (09:47 IST)
पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात गल्ली क्रमांक 8 येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या जाळ्यांखाली अडकून सात कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच आठ जणांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 
 
पुणे-नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकाच्या अलीकडे वाडिया फार्मच्या जागेवर ब्ल्यू ग्रास कंस्ट्रकशनची इमारत उभारण्यात येत असून या इमारतीच्या बेसमेंटचे काम आता सुरू आहे. तेथे भूमिगत स्लॅब टाकण्यात येत होता. त्यासाठी आवश्यक लोखंडी छत तयार करण्याचं काम 15 कामगार करत होते. ते प्रामुख्याने लोखंडी गजांचे वेल्डिंग करत होते. त्यावेळी हे वजनदार लोखंडी छत कोसळले.
 
हा लोखंडी सांगडा इतका मोठा होता की त्याखशली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. जवानांनी कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला केला. एका मागोमाग एक त्यांनी सात जणांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असं येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितलं आहे.
photo: twitter

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भाजप आमदार संजय उपाध्याय यांना तिसऱ्यांदा धमकी, पोलिस तक्रार दाखल

सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा

मेन-हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा अनेक तास बंद राहणार

LIVE: महाराष्ट्र होणार बायोटेक हब

नागपूर-पुणे विमान उड्डाण 6 तासांनी उशिराने, प्रवाशांचा गोंधळ

पुढील लेख
Show comments