Festival Posters

पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले

Webdunia
सोमवार, 23 डिसेंबर 2024 (09:29 IST)
Pune News: महाराष्ट्रातील पुण्यात रविवारी मध्यरात्री एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यात दोन मुलांसह तीन जण जागीच ठार झाले. या रस्त्याच्या अपघाताबाबत सांगितले जात आहे की, मद्यधुंद ड्रायव्हरने पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना त्याच्या डंपरने चिरडले, ज्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नऊ जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
ALSO READ: नवीन मोबाईल न मिळाल्याने सांगलीत 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात रविवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास डंपरचालकाने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. वैभवी पवार 1, वैभव पवार 2 आणि विशाल पवार 22  अशी अपघातातील मृतांची नावे आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेले व जखमी हे सर्व मजूर कुटुंबातील असून ते अमरावती येथून येथे आले होते. रस्त्याच्या कडेला फूटपाथवर हे सर्वजण झोपलेले असताना एका भरधाव डंपर मद्यधुंद चालकाने या झोपलेल्या लोकांना चिरडले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार, माजी आमदार आसिफ शेख यांचा भाजपला सवाल

अमरावतीत उष्णतेची लाट, तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

पुढील लेख
Show comments