Marathi Biodata Maker

9 वर्षांच्या मुलावर बिबट्याची झडप, पुण्यातील घटना

Webdunia
रविवार, 17 एप्रिल 2022 (11:57 IST)
पुण्यातील खेड तालुक्यात रेटवडी गावात नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकरी हादरले आहे. सार्थक नवनाथ वाबळे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसात ही दुसरी घटना घडली आहे. 
 
रेटवडी येथील वाबळे वस्तीतील रहिवासी नवनाथ वाबळे हे आपल्या मुला सार्थक सह संध्याकाळी 7:15 वाजेच्या सुमारास गुरांच्या गोठ्यातून घरी जात असताना सार्थकने त्याच्या पाळीव कुत्र्याच्या पिल्ल्याला कडेवर घेतले होते. तेवढ्यात झुडप्यात लपून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या सार्थकवर हल्ला केला. सार्थक या हल्लेमुळे घाबरला त्याला या हल्ल्यात पोटावर आणि दंडावर मोठ्या जखमा झाल्या आहे. बिबट्याने सार्थकवर हल्ला केला बघून सार्थकच्या वडिलांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे बिबट्याने सार्थकच्या हातातील कुत्र्याचे पिल्लाला घेऊन धूम ठोकली. या घटनेमुळे रेटवडी  गावातील नागरिक हादरले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवारांचे रुग्णालयातुन सुनेत्रा पवारांना मत देण्याचे जनतेला आवाहन

LIVE: महाराष्ट्र उकाड्याचा सामना करण्यास सज्ज

शिक्षकाकडून विचित्र शिक्षा, मुलांना एकमेकांच्या पॅन्टमध्ये खाज सुटणारे पान कोंबायला सांगितले; मुख्याध्यापक निलंबित

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना 'दहशतवादी' म्हटले

"मी येसुबाईंसारखी लढेन, अहिल्यादेवींसारखं राज्य करेन"; बारामती पोटनिवडणुकीच्या सभेत सुनेत्रा पवार या दिवंगत पती अजित पवार यांच्या आठवणीने भावूक झाल्या

पुढील लेख
Show comments