Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील मन सुन्न करणारी घटना,बहिणीच्या मुलीलाच मावशीने दाखवले पॉर्न व्हिडिओ!

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (08:50 IST)
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. आपल्या बहिणीच्या मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने बळजबरीने पॉर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी महिलेच्या प्रियकरालाही अटक केलेली आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडलेली आहे. एप्रिल महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी सोडलेले होते. या काळात आरोपी महिलेनं आपल्या बहिणीच्या मुलीलाच जबरदस्तीने पॉर्न व्हिडिओ दाखवले होते.
 
आपल्या घरी परतल्यानंतर पीडित मुलीने सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली आहे.आपल्या बहिणीचे असा प्रकार केल्यामुळे तिला जबर धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन या महिलेनं पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून दोघांनाही अटक केली आहे.
 
लॉकडाउनच्या काळात पीडित मुलीला जेव्हा बहिणीच्या घरी सोडलेले होते. तेव्हा आरोपी महिलेचा प्रियकर हा घरी ये जा करत होता.दोघांनी या पीडित मुलीला जबरदस्ती करत पोर्न व्हिडिओ दाखवले होते.आधीच लॉकडाउन असल्यामुळे बाहेर पडायचं आणि कुणाला काय सांगायचं असा प्रश्न पीडितेला पडला होता. त्यामुळे आरोपी मावशी आणि तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत अत्याचार केलेले आहेत. काही दिवस त्यांचा हा अत्याचार सहन केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परतली तेव्हा सगळा प्रकार तिने आईला सांगितलेला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केलेला आहे. अटक केल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी या दोघांची कोरोना चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघांना कारागृहात पाठवता आलेले नाहीये. या दोघांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांचीही रवानगी तरुंगात करण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख