Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात तरुणाची कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Webdunia
शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (11:30 IST)
पुण्यात एका तरुणाने कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वारजे येथे घडली आहे. 

मयत तरुणाच्या मित्राने कंत्राटदाराकडून 25 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र त्याने न फेडता तो उत्तरप्रदेशात निघून गेला.या वरून कंत्राटदाराने मयताला उसने पैसे घेण्यासाठी त्रास द्यायला सुरु केले.  

या कंत्राटदाराने 30 सप्टेंबर रोजी रात्री मयत आणि इतर दोन मजुरांना एका खोलीत बंद करून मारहाण केली. 
या बाबतची माहिती मयत तरुणाने आपल्या आईला उत्तरप्रदेशात दिली. पैसे न दिल्याने कंत्राटदाराने तरुणाला शिवीगाळ केली. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आणि पोटावर वार करून  आत्महत्या केली. त्याच्या मित्रांनी त्याची अवस्था पाहता तातडीनं रुग्णालयात नेले असता रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. 
या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या कंत्राटदाराला अटक केली आहे. प्रकरणाची पुढील कारवाई सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारकडून स्टेज सादरीकरणाबाबत अलर्ट जारी,सेन्सॉरशिप आवश्यक

मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोडला विश्वविक्रम, सर्व गोलंदाजांच्या पुढे गेला

जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?, भाषांविषयी १० तथ्ये जाणून घ्या

रील्स बनवण्याचा छंद बनला मृत्यूचे कारण, दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली

पुढील लेख
Show comments