Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फॉर्च्युनर आणि दुचाकीची धडकत एका तरुणाचा मृत्यू ,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुतण्याला अटक

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (09:07 IST)
पुणे -नाशिक मार्गावर आंबेगाव तालुक्यात मौजे एकलहरे गावाजवळ शनिवारी रात्री एका फॉर्च्युनर कार ने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओम भालेराव असे या मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पुतणा चालवत होता.पुणे नाशिक महामार्गावर फॉर्च्युनर कार मंचर गावाला चुकीच्या दिशेने जात असताना त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आणि दोघांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात  तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कार चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंचर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत नव्हता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे.अहवालाची प्रतीक्षा आहे. या सम्पूर्ण घटनेवर आमदार म्हणाले, ही घटना दुर्देवी असून मी कोणत्याही चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments