Dharma Sangrah

पुण्यात रेल्वेत चढताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Webdunia
रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (12:39 IST)
सध्या सर्वत्र दिवाळीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी बसने रेल्वेने प्रवास करत आहे. बस आणि रेल्वे स्थानकात लोकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकात दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दारुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बौद्धा माजी उर्फ यादव(21) असे या मृतक तरुणाचे नाव आहे. गाडीची वाट पाहत असणाऱ्या या तरुणाची दिवाळीसाठी गावी जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

पुणे दानापूर गाडीत चढण्याचा प्रयत्नात असलेल्या या तरुणाला खोकला आला आणि त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला बाजूला नेऊन स्थानकावर बसविले त्याची शुद्ध हरपली होती. पुणे स्थानकावरील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. मयत तरुणाला मद्यपान आणि तंबाखू गुटख्याचे सेवन असल्याचे सांगितले जात आहे. मयत तरुण हा आजारी होता. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती पोटनिवडणूक : काँग्रेसने माघार घेतल्यानंतर ३० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली

प्रमाणपत्रासाठी लाच मागणे महागात पडले, एसीबीची कारवाई; मुख्याध्यापिकेला अटक

IPL 2026 कोलकाताला हरवून लखनौ अव्वल ५ मध्ये दाखल, गुणतालिकेत बदल

अजितदादांच्या खास लूकमध्ये पार्थ पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली

अलविदा, बिहार! नितीश कुमार दिल्लीत परतले, आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार

पुढील लेख
Show comments