Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगल मॅपवरुन रस्ता शोधणं तरुणीच्या जीवावर

pune news
Webdunia
गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (13:36 IST)
गुगल मॅपवरुन रस्ता शोधणे खूप सामान्य सवय असली तरी असे करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सिंहगडावर दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण आणि तरुणीने परतत येताना रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली मात्र मॅपवर चुकीचा मार्ग दाखवल्याने ते महामार्गावर आले. काही वेळातच रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यावर वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. 
 
हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात घडला असून रिदा इम्तियाज मुकादम असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार जखमी झाला आहे. 
 
23 वर्षीय रिदा आणि 30 वर्षीय नटराज हे खराडी भागातील एका आयटी कंपनीत इंजीनियर म्हणून कार्यरत आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले असताना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत होते अशात ते मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. नंतर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. तेव्हा नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेताना भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली

LIVE: १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर

नागपुरात शुक्रवारच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त

Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments