Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदी सीरम कंपनीला भेट देणार

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:24 IST)
कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम कंपनीत तयार होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील शंभर देशाचे राजदूत पुण्यातील सीरम कंपनीला भेट देणार आहेत. याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत.
 
राजदूतांच्या दौर्‍याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दि. 27 रोजी राजदूत सीरमला भेट देणार असून नरेंद्र मोदींचा दौरा अद्याप आलेला नसून 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे समजते. याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे.
 
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून ‘मिनिट टू मिनिट टू’ कार्यक्रम निश्चित केला आहे. दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत.
 
करोनाच्या लशीचा सद्यस्थितीची आढावा घेण्यासाठी 100 देशांचे राजदूत येत्या शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. दिल्ली येथून 98 तर मुंबईहून दोघे राजदूत पुण्यात दाखल होणार आहेत. या 100 राजदूत दोन गटांमध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’ तसेच हिंजवडी येथील ‘जिनोव्हा बायो-फॉर्मासिटिक्युअल्स’ला भेट देणार आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments