Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात प्रेयसीचा खून करून मृतदेह ऑटोमध्ये टाकून आईच्या घरासमोर टाकला

Webdunia
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (16:56 IST)
पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह आईच्या घरासमोर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 12 ते 3 दरम्यान ही घटना घडली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तरुण हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या 2 वर्षांपासून राहत होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ गोष्टींवरून वाद झाला. यावर तरुण प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून ला आणि तिचे मृतदेह ऑटोमध्ये टाकून समर्थ जगताप नगर परिसरात प्रेयसीच्या आईच्या घरासमोर रिक्षा उभी करून पळून गेला. आरोपी हा रिक्षा चालवायचे काम करतो. 

बुधवारी सकाळी दिवस उजाडतातच स्थानिकांना तरुणीचा मृतदेह ऑटो रिक्षात आढळला. त्यांनी वाकड पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. वाकड पोलीस आरोपी प्रियकराचा शोध लावत आहे.  
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर्सची भरती होणार नाही,अमेरिकन सैन्याने बंदी घातली

भारतीय कुस्तीगीर दुसऱ्या रँकिंग मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीत

कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलीची हत्या करून सेप्टिक टँकमध्ये फेकले, ८ दिवसांनी शिरच्छेदित मृतदेह नदीकाठी पुरण्यात आला

ठाण्यातील पॉश परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्याला अटक

शिवसेना यूबीटीच्या कोकणातील या नेत्यांची हकालपट्टी, पक्षाने उचलले हे मोठे पाऊल

पुढील लेख
Show comments