Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात 12 लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुण्यात 12 लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
, गुरूवार, 13 एप्रिल 2023 (08:05 IST)
पुणे :पुण्यात वेगवेगळ्या घटनेत अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत 12 लाखांचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकने कोंढवा परिसरातून 8 लाखांचा 40 किलो 245 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीकडून दुचाकी, मोबाइल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
 
व्यंकट मनोहर सुर्यवंशी (वय 40 रा. भोसरी, मूळ-उमापूर, बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसऱया घटनेत वाडेबोलाई परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक दोनने कारवाई करत 4 लाख रुपये किमतीचा 21 किलो गांजा जप्त केला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अमली पदार्थ विक्री करणाऱयांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एकजण गांजा बाळगून असल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल दळवी यांना मिळाली. पथकाने सापळा रचून व्यंकट सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 किलोवर गांजा, दुचाकी, मोबाइल असा 8 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त केला. तर पथक दोनने वाडेबोलाई परिसरातील घटनेत 4 लाखांचा 21 किलो गांजा जप्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोंद्यातील मच्छिमारांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ कामगारांना पकडले !