Dharma Sangrah

पुण्यामध्ये तरुणीला खासगी व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करून खंडणी उकळली, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2024 (10:34 IST)
Pune News: महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एका तरुणीला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खासगी व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
ALSO READ: पुण्यातील फोटो स्टुडिओला भीषण आग
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणीला व्हिडिओवरून ब्लॅकमेल केले जात होते. गुन्हेगारांनी प्रथम तरुणीला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज केला. त्यानंतर तरुणीच्या खासगी व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवून व्हिडिओ लीक करण्याची धमकी देण्यात आली. व्हिडिओ व्हायरल होण्यापासून थांबवायचे असेल तर संपूर्ण 5 लाख रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात आले. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने तरुणी घाबरली आणि पैसे देण्यास तयार झाली. व पोलिसांनी आरोपीला खंडणी घेताना रंगेहात पकडले. तसेच पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत सराईत गुन्हेगारांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा! जाणून घ्या काय स्वस्त झाले

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

3 नवीन आयुर्वेदिक एम्स, 5 प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे आणि परवडणाऱ्या औषधांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची कर्तव्ये स्पष्ट केली

प्रसिद्ध क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांना एसआयआर नोटीस

पुढील लेख
Show comments