Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात 12 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide
, मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025 (14:35 IST)

पुण्यातील रावेत येथे 18 वर्षीय तरुणाने अभ्यासाच्या तणावाखाली येऊन राहत्या खोलीत नॉयलॉनच्यादोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली आहे. अवधूत अरविंद मोहिते (18) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

अवधूत हा मूळगाव वाखरी, ता. फलटण, जि. साताराचा रहिवासी असून रावेतच्या एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकायचा. सोमवारी त्याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास खोलीत नॉयलॉनची दोरी पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

थोड्याच वेळात ही घटना त्याच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली त्याने शेजारच्यांच्या मदतीने तातडीने अवधूतला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तो शांत आणि अभ्यासू विद्यार्थी असून गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहे.

Edited By - Priya Dixit


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र सरकारने कृत्रिम वाळूच्या वापरासाठी धोरण अंतिम केले