Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोना

Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (09:51 IST)
दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दिवसरात्र काम करणारे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राव यानी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्रास सुरू झाल्याने कोरोना चाचणी केली. सोमवारी चाचणीचा अहवाल 
पॉझिटिव्ह आला. 
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील सौरभ राव रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांच्या सेवा करत होते.  एक वर्ष कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर 16 मार्च 2021 रोजी सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस झाल्यानंतर राव यांना ही लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला. परंतु शुक्रवार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. लसीकरण झाल्यानंतर राव यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. लसीकरणामुळे त्रास होत असेल असे राव यांना वाटले. परंतु त्रास अधिकच होत असल्याने कोरोना चाचणी केली, यात राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments