Dharma Sangrah

पुण्यातील कंपनीने तयार केलेल्या अॅपच्या मदतीने घरीच होणार कोरोनाची चाचणी; ICMR ने दिली मंजुरी

Webdunia
गुरूवार, 20 मे 2021 (15:33 IST)
आयसीएमआरने एका अशा टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. याच्या मदतीने आपण घरीच कोरोनाची चाचणी करू शकतो. आयसीएमआरने होम आयसोलेशन टेस्टींग किटसाठी (MY LAB DISCOVERY SOLUTION LTD ) माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशंस लिमिटेड या पुण्यातील कंपनीला मंजुरी दिली आहे.
 
या किटचे नाव COVISELF (Pathocatch) असे आहे. या किटच्या साहायाने नागरिक घरीच कोरोनाचे नाकाद्वारे नमुने घेता येणार आहेत. यासाठी आयसीएमआरने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. दरम्यान, होम टेस्टिंग अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर वर उपलब्ध आहे. घरी चाचणी करणाऱ्या नागरिकांना ह अॅप डाऊनलोड करावे लागेल. दरम्यान मोबाईल अॅपची चाचणी प्रक्रिया पूर्णपणे समजवण्यात आली आहे आहे.
अशा आहेत सूचना…
घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल.
घरीच करण्यात येणारी ही चाचणी कंपनीने दिलेल्या म्युन्युअलनुसार केली जावी.
फक्त लक्षणे असलेल्या नागरिकांना याद्वारे घरीच चाचणी करता येईल. तसेच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अले असतील.
मोबाइल अॅपद्वारे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.
जे घरीच चाचणी करणार आहेत त्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागेल आणि ज्या फोनवर अॅप डाउनलोड केले आहे त्याच फोनवर हा फोटो काढावा लागेल.
मोबाईल फोनवरील डाटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाईल.
रुग्णाची गोपनियता कायम ठेवली जाईल
या टेस्टद्वारे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल ते पॉझिटिव्ह समजले जातील आणि त्यांना इतर कुठल्या टेस्टची गरज पडणार नाही.
जे नागरिक पॉझिटिव्ह आढळतील त्यांना होम आयसोलेशनबाबत आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल..
लक्षणे असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना RTPCR टेस्ट करावी लागेल.
सर्व रॅपिड अँटिजन निगेटिव्ह असलेल्यांना लक्षणे नसलेली किंवा संशयित कोविड रुग्ण मानले जाईल आणि जोपर्यंत RTPCR टेस्टचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्येच रहावे लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केली, डोंबिवली मधील घटना

मोदी मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो विस्ताराला मान्यता दिली

नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांना धडक देणाऱ्या आरोपी चालकाला अटक

चंद्रपूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाला अटक

LIVE: अहिल्या नगरमध्ये महाराष्ट्र काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण

पुढील लेख
Show comments