rashifal-2026

पुणे जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात गोखले बिल्डर्सनी अखेर घेतली माघार

Webdunia
मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025 (10:57 IST)

Photo: Social Media
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाच्या व्यवहारात सहभागी असलेल्या गोखले बिल्डर्सने माघार घेतली आहे. तसेच कंपनीचे प्रमुख विशाल गोखले यांनी ट्रस्टला ईमेल करून व्यवहार रद्द करण्याची माहिती दिली असून व्यवहारातील 230 कोटी रुपये परत मिळावे अशी मागणी केली आहे.

ALSO READ: पुण्यात एटीएसचे 10 ठिकाणी छापे, संशयित दहशतवाद्याला अटक

करारातील अटीनुसार, व्यवहार रद्द केल्यास पैसे परत करण्याची कोणतीही सक्ती नसणार. त्यामुळे आता गोखले बिल्डर्सचे कोटी रुपये अडकण्याची शक्यता आहे.

ALSO READ: जमीन घोटाळा प्रकरणात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरूद्ध पुणे जैन ट्रस्टने पंतप्रधानांकडे केली ही मागणी

आता या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांकडे होणार असून पुढील निर्णय आयुक्तांच्या आदेशावरच अवलंबवून आहे.

ALSO READ: पुणे पोलिसांची नागपूर शहरातील एका तरुणीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक

या प्रकरणात जैनमुनींनी पत्रकार परिषद घेत या विषयाला कोणतेही राजकीय रंग न देण्याचे म्हटले आहे. हा प्रश्न गरिबांच्या भविष्याशी निगडित असल्याचे म्हणाले.

पंतप्रधान मोदींना सकल समाजाच्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार असून निवेदन देणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments