Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात वाढले गुलियन-बॅरे चे रुग्ण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली मोठी घोषणा

पुण्यात वाढले  गुलियन-बॅरे चे रुग्ण  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली मोठी घोषणा
Webdunia
सोमवार, 27 जानेवारी 2025 (14:37 IST)
पुण्यातील वाढत्या गुलियन-बॅरे (Guillain Barre) सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. या आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, ज्या गरिबांना उपचार घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे.या सिंड्रोमचा परिणाम नवजात बालकांपासून ते 60 वर्षांवरील वृद्धांपर्यंतच्या लोकांमध्ये दिसून येत आहे.
 
पुणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या  गुलियन-बॅरे  सिंड्रोमचे 64 रुग्ण आढळून आल्याचे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले. काहींना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले तर काही रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ALSO READ: सोलापुर मध्ये गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
सध्या पुणे महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 64 रुग्ण आहेत. त्यापैकी 13 व्हेंटिलेटरवर आहेत... 5 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गियान-बॅरे सिंड्रोमबाबतही घोषणा केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील  गुलियन-बॅरे  सिंड्रोम (जीबीएस) प्रकरणांवर "महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला."

ते पुढे म्हणाले, “पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील बाधितांवर वायसीएम रुग्णालयात उपचार केले जातील. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांवर पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे.या आजाराचे उपचार महागड़े असून हा निर्णय घेण्यात आला आहे. "मुंबईला परतल्यानंतर, आम्ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुढील निर्णय घेऊ ज्यांना पुण्यातील सरकारी ससून रुग्णालयात मोफत उपचार करता येतील."असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Edited By - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना युबीटीला मोठा धक्का कारण अनेक नेत्यांनी पक्ष सोडला

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्र्यांनी घेतला सार्वजनिक दरबार, म्हणाले - महायुतीमध्ये राजकीय शत्रुत्व नाही

महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर 2 जखमी

भरधाव जीप आणि बसची धडक, ६ जणांचा मृत्यू, २ जखमी

तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याने हिंदी कविता वाचली नाही, शिक्षकाने गाठला क्रूरतेचा कळस

पुढील लेख
Show comments