Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

rape
, शुक्रवार, 17 मे 2024 (17:06 IST)
पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने अमानवीय अत्याचार करत पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल करून कुलूप बसवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस देखील या प्रकारामुळे चक्रावले असून या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

सदर घटना 11 मे रोजीची आहे. एका महिलेला सतत संशय घेत मारहाण करण्यात आली असून पतीने ब्लेडने महिलेच्या गुप्तांगावर वार केले नंतर तिचे हातपाय बांधून गुप्तांगाला लोखण्डी खिळ्याने दोन छिद्र पाडले आणि त्यावर पितळी कुलूप लावले. 

पीडित महिलेने पतीच्या या अशा अमानवीय कृत्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हे दाम्पत्य नेपाळचे असून महिला गृहिणी आहे तर पती वॉचमन चे काम करतो. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे.  
 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप