शिवसैनिकांनी पुण्यात भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्यांवर केलेल्या हल्ला प्रकरणी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील यांनी हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भाजप कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल असा इशारा दिला.
शिवसैनिकांनी आज भाजपचे माजी खासदार मा. किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ला बाबत प्रतिक्रिया देताना बोलत होते. ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा आता सर्वत्र दिसून येत आहे. ते आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आले आहे. आजच्या हल्लेमुळे सोमय्या घाबरून गप्प बसणार नाही. मागे देखील यवतमाळ येथे भावना गवळी यांच्या प्रकरणात त्यांच्यावर हल्ला असो किंवा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा प्रकरणात सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी स्थानबद्ध करायचा प्रयत्न असो असं करून देखील ते घाबरून घरी बसले नाही. आणि आज झलेल्या हल्ल्यामुळे देखील ते घाबरून गप्प बसणार नाहीत. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. कायद्यावर आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही याचे उत्तर कायदेशीरपणे देऊ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.