भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे दौऱ्यादरम्यान हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा मॉब लिंचिंग करुन सोमय्यांची हत्या करण्याचा प्लान होता. याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून केली आहे. सोमय्यांवर जाणीवपूर्वक कट रचून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉब लिंचिंगचा कट रचून सोमय्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सोमय्यांवर झालेला हल्ला हा जाणीवपूर्वक रचलेला कट होता असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमय्यांना पोलिसांनी संरक्षण दिले नाही उलट ते या कटात सामील असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.