पुणे शहरातील हडपसर भागात एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. एएनआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एका गोदामातून ज्वाळा उठताना दिसत आहेत. हडपसर येथील वैदूवाडी येथील भंगार गोदामाला भीषण आग लागली. पुणे अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूहोते अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
<
#WATCH | Pune, Maharashtra | A massive fire broke out at a scrap godown in the Hadapsar area of Pune City. Fire tenders are present at the spot. More details awaited.
— ANI (@ANI) December 7, 2024
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्निशमन दल पाठवून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.