Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात शाळेच्या बसला भीषण आग, विद्यार्थी बचावले

Webdunia
शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (21:01 IST)
पुणे शहरातील खराडी परिसरात गुरुवारी शाळेच्या बसला आग लागली आणि या घटनेत किमान 15 विद्यार्थी सुरक्षित बचावले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
 
अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, यावेळी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी जात होते.
 
ते म्हणाले, चालक शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना दुपारी 2.45 च्या सुमारास वाहनातून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ बस थांबवली आणि उपस्थित लोकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बसमधून उतरवले.
 
विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर चालकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने संपूर्ण बस जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी ही आग 'शॉर्ट-सर्किट'मुळे लागल्याचे दिसते, मात्र खरे कारण शोधले जात आहे.खराडी परिसरातील तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्कूल बसला आग लागली. यावेळी बस मध्ये 15 ते 20 विद्यार्थी होते.त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. यानंतर बस ने पूर्ण पेट घेतला.अग्निशमन दलाच्या दोन बम्ब ने आग आटोक्यात आणली.  

खराड़ी येथून शाळेची बस महावितरण कार्यालयाच्या परिसरातून निघाली असून बस मध्ये तांत्रिक बिगड़ आला आणि चालकाने लगेच प्रसंगवधान राखुन बस थांबवली अणि विद्यार्थ्यांना बस मधून बाहेर काढले. लगेचच बस ने पेट घेतला आणि सर्व विद्यार्थी बचावले.
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये उघडणार, केंद्र सरकारची मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

पंतप्रधान मोदींनी ज्युनियर हॉकी संघाचे पाचव्यांदा विजेतेपद जिंकल्याबद्दल कौतुक केले

ZIM vs PAK 3rd T20 : झिम्बाब्वेने 3rd T20 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला

आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर बस आणि पाण्याच्या टँकरची धडक, आठ जणांचा मृत्यू

दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय, शेतकरी या दिवशी मोर्चा काढणार

पुढील लेख
Show comments