Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुक्ताची उणीव भासली; मतदानानंतर शैलेश टिळक भावूक

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:25 IST)
पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करताना आम्हा कुटुंबीयांना मुक्ताची उणीव भासत आहे. त्या असत्या तर पोटनिवडणूक लागलीच नसती, त्यांच्या नसण्याने आम्हाला खूप दु:ख होत आहे, अशी भावूक प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी रविवारी दिली.
 
शैलेश टिळक यांनी कुटुंबियांसह सकाळी साडेअकराच्या सुमारास कन्या शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ते मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले, या निवडणुकीत भाजप मोठय़ा मताधिक्याने निवडून येणार आहे. सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. आम्हीही टिळक कुटुंबियांनी मतदान केले. मतदानावेळी मुक्ताची उणीव भासली. ती असती तर ही पोटनिवडणूक लागलीच नसती. तिच्या नसण्याने मोठे दु:ख होत आहे.
 
सत्ताबदलानंतर ही होणारी पहिली पोटनिवडणूक होती. काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची असल्याचे टिळक म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

अंतर्राष्ट्रीय बाल रक्षा दिवस

उत्तराखंड : गंगोत्री हायवेवर पहाडावरून दगड कोसळल्याने एकाच मृत्यू, महिला बेपत्ता तर अनेक लोक बेपत्ता

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : त्रस्त बार मालक HC ला म्हणालेत-आम्हाला बळीचा बकरा बनवला जाते आहे

शरद गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या प्रयत्नात असल्याचा सुनील तटकरे यांचा दावा

अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 57 जागांवरील उमेदवारांचे भवितव्य ठरणार

हॉटेल ताज आणि विमानतळ उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक

दिल्लीनंतर नागपूरमध्ये मशीन गडबडली, हवामान खाते म्हणाले-54 डिग्री तापमान न्हवते

Pune Road Accident: अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेने अटक केली

Parents Day Wishes2024 in Marathi जागतिक पालक दिन शुभेच्छा

Lok Sabha Election : आठ राज्यांतील 57 जागांवर मतदान सुरू, पंतप्रधानांचे मतदान करण्याचे आवाहन

पुढील लेख
Show comments