Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Webdunia
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (09:48 IST)
करिअर बनवतो, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा’ असं म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय 58) याच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. आरोपी नौशाद शेख हा पिंपरी- चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुले आरोपीच्या निवासी शाळेत येतात. आरोपी ठिकठिकाणी जाऊन सेमिनारद्वारे मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो. दरम्यान, सन 2021 मध्ये शेख याने यवतमाळ मध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2 लाख 26 हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता.

घरच्यांना खोटं सांगेन अशी धमकी दिली
दरम्यान, सन 2022 मध्ये आरोपीने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन असं सांगत तो धमकावू लागला.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोल्यातून 25 वी अटक

शिवसेनेच्या यूबीटी कार्यकर्त्यांवर नवनीत राणा यांचा आरोप

LIVE: शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांच्या बॅगेची ही झडती, राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार राजनाथ सिंह यांचे विधान

पुढील लेख
Show comments