Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता 1991 रुपयांत विमानाने पुणे ते गोवा, सिंधुदुर्ग थेट प्रवास 31 ऑगस्ट पासून सुरु

Webdunia
सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (16:44 IST)
पुणे पासून गोवा आणि सिंधुदुर्ग साठी 31 ऑगस्ट पासून थेट विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवारीच होणार आहे. ही विमानसेवा गोव्यातील विमान कंपनी फ्लाय 91 तर्फे करण्यात आली आहे. फ्लाय 91 ही कंपनी मूळ गोव्याची आहे.

या कंपनीने काही महिन्यांपूर्वी विमानसेवा सुरु केली असून गोवा, आगात्ती, हैद्राबाद, जळगाव, बंगळुरू, पुणे, सिंधुदुर्ग शहराला जोडणाऱ्या विमानसेवेची घोषणा केली असून या सेवेचा शुभारंभ गोवा, हैद्राबाद, जळगाव, बंगळुरू आणि आगात्ती या ठिकाणी करण्यात आला. आता ही विमानसेवा पुणे शहरासाठीयेत्या 31 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे. 
 
उत्तर गोव्यातील मोप येथे विमानतळावरून सकाळी 6:15 वाजता पुण्याचे विमान उड्डाण करेल. आणि सकाळी 7:40 वाजता पोहोचेल. तर पुण्याहून गोव्यासाठी हे विमान सकाळी 10:55 वाजता उड्डाण करेल.
तर पुण्यातून सिंधुदुर्गसाठी हे विमान सकाळी 8:05 वाजता सुटेल आणि सकाळी 9:10 वाजेच्या सुमारास पोहोचेल. 
नन्तर सिंधुदुर्गवरून पुण्यासाठी हे विमान सकाळी 9:30 वाजता सुटेल आणि 10:35 वाजेच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. 
ही विमान सेवा सिंधुदुर्ग आणि गोव्यासाठी थेट असल्यामुळे तसेच सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा आनंद घेता येणार असून हे प्रवाशांसाठी सोयीस्कर असणार आहे. 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बदलापूर घटनेनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय, प्रत्येक शाळेच्या वॉशरूम आणि क्लासरूममध्ये पॅनिक बटण बसवणार

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी

Bedroom Dream स्वप्नात शयनकक्षाशी संबंधित या 5 गोष्टी पाहणे शुभ

येत्या काळातील 5 महत्त्वाच्या नोकऱ्या कोणत्या आणि त्यासाठी कोणती कौशल्यं विकसित करावी लागतील?

साजूक तुपाचे त्वचेवर उपयोग करा, सुंदर त्वचा मिळवा

सर्व पहा

नवीन

पावसाळ्यात आजारी पडण्यापासून वाचायचे असेल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा

धक्कादायक! मथुरेत 3 महिन्यांच्या वासरूवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीला अटक

भाजपची जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची पहिली सुधारित यादी जाहीर, 15 नवीन उमेदवारांचा समावेश

पुण्यात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह घोषणाबाजी, गुन्हा दाखल

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने, फडणवीसांच्या राजीनाम्याची केली मागणी

पुढील लेख
Show comments