Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाईन क्लास, अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मजकूर पाठवणारा शिक्षकाला अटक

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (09:18 IST)
ऑनलाईन क्लासमध्ये 10 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवणाऱ्या शिक्षकाला मुंबईतील सांताक्रुझ पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना प्रकार 6-7 सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लास सुरु असताना शिक्षकाने विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवले होते. शिक्षकाने रविवारी 3 स्टिकर्स पाठवले होते. मात्र थोड्या वेळाने ते डिलिट केले. व त्यानंतर सोमवारी देखील शिक्षकाने एक अश्लील स्टिकर पाठवला. विद्यार्थीनीने ही बाब आपल्या पालकांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
 
दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहिता अंतर्गत विनयभंग करण्याचा, आयटी अॅक्ट (IT Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी शिक्षकांनी विद्यार्थींनीवर बलात्कार, विनयभंग केलेल्या अनेक घटना देशातील विविध भागातून समोर आल्या आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणातही असे प्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भाजप नेत्याने घरात गोळीबार केला, 3 मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

पुण्यात एका अभियंत्याने पत्नीवर विश्वासघातचा संशय घेऊन त्याच्या अल्पवयीन मुलाचा गळा चिरला

23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीद दिवस

LIVE: शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे राजकीय खळबळ,संजय राऊत म्हणाले-

पुढील लेख