Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातून महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी पोलिसांनी केली खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (17:16 IST)
महाराष्ट्र  विधानसभा निवडणूक 20 नोव्हेम्बर ला होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या पूर्वी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर ( Khed -Shivapur) टोल नाक्यावरून एका खासगी वाहनातून 5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीतून वाहनातून जप्त केलेली रकम पाच कोटी रुपयांची आहे. 
 
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यावर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री 8 वाजेच्या सुमारास एका संशयित खासगी वाहनाला थांबविण्यात आले आणि त्या वाहनातून 5 कोटींची रकम जप्त करण्यात आली.

पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून ही रक्कम कुणी दिली आणि कुठे घेऊन जायचे होते या बाबत चौकशी करण्यात आली आहे. राजगड खेड -शिवापूर  पोलीस ठाण्यात ही रक्कम नेण्यात आली असून पोलीस ठाण्यात रक्कम मोजण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.

हे वाहन कुठून आले आणि पैसे कोठे जात होते, याचाही तपास सुरू आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास लावत आहे.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

काँग्रेसने बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांची 6वर्षांसाठी हकालपट्टी केली

मुंबई पोलिसांनी ट्रक मधून 80 कोटी रुपयांची 8476 किलो चांदी जप्त केली

महाराष्ट्रात ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट,चाकात लोखंडी गेट अडकले

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक,आतापर्यंत 24 आरोपींना अटक

उदय सामंत पुन्हा रत्नागिरीतून विजयी होणार की उद्धव सेना जाणून घ्या समीकरण

पुढील लेख
Show comments