rashifal-2026

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (09:26 IST)
पुणे जिल्ह्यातील 56 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन आज दुपारी 12:30 वाजता पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून होणार.अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवे यांनी दिली. 

महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नवीन योजना सुरु केली असून या योजनेमुळे महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करून 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना परीक्षण देऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार. 
 
महाराष्ट्रात एकूण1 हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार असून वर्धा येथेया कौशल्य केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार असून  या कार्यक्रमास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता  मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार आहेत.
 
पुण्यातील 56  महाविद्यालयात या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन होणार आहे. 
या कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक युवक आणि युवती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ  आणि मान्यवरांनी जवळच्या महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन समारोहासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Shubman Gill दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान शुभमन गिल या दिवशी परतणार!

Cyclone Ditva तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू, पुद्दुचेरीमध्ये शाळा बंद

सोलापूर येथे भीषण अपघात; नवविवाहित जोडप्याच्या कारची ट्रकला धडक पाच जणांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील १८,००० शाळा बंद राहणार; शिक्षकांनी राज्यव्यापी बंदची घोषणा केली

मला १ कोटी रुपये द्या, मी तुम्हाला ११,००० मते मिळवून देतो; चांदवडमध्ये ईव्हीएम 'मशीन डील'ची ऑडिओ क्लिप व्हायरल

पुढील लेख
Show comments