पुण्यात पिसोळी भागात एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागण्याचे वृत्त मिळाले आहे. या अग्निकांडात संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. पहाटे 3:30 च्या सुमारास लाकडी सामानाच्या फर्निचर गोडाऊनला आग लागण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु आहे.
आग कशामुळे लागली अद्याप कारण कळू शकले नाही. या अग्निकांडात संपूर्ण गोडाऊन आणि फर्निचरचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.