Marathi Biodata Maker

म्हणून पुण्याचा भिडे पूल आता पाडण्यात येणार

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (15:07 IST)
पुण्यात मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. टिळक पूल (पुणे महापालिकेसमोरील पूल) ते म्हात्रे पूल दरम्यानचा नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार असल्याने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे येथील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
 
नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. भिडे पूलही लहान असल्याने तो पाडण्यात येणार आहे. वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहे.
 
या प्रकल्पासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे 11 टप्पे असून संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दोन ठिकाणी अनुक्रमे 351 कोटी आणि 600 कोटी रुपये खर्चून काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद करावे लागणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.
photo: facebook

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

LSG vs PBKS :पंजाबने लखनौला सात गडी राखून पराभूत करत विजय मिळवला

व्हाइट हाऊसमध्ये पुन्हा एकदा गोळीबार ,डोनाल्ड ट्रम्प आत उपस्थित होते

LIVE: १ जूनपासून नागपूर विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द केली जाणार

हेल्मेट किंवा सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे अडचणीत आणेल! दंडासोबतच तुमचा परवानाही निलंबित केला जाईल

पुढील लेख
Show comments