suvichar

Pune Weekend Lockdown : पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा

Webdunia
शनिवार, 19 जून 2021 (15:42 IST)
पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहे, असं पवार यांनी सांगितलं. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पर्यटन स्थळी येऊ नका
पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी महाबळेश्वर, खोपोली, लोणावळा आणि खंडाळ्यात गर्दी करायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी पर्यटन स्थळी येऊन गर्दी करू नये. पावसात भिजू नये. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना तुम्ही घराबाहेर पडण्याचं कारणच नाही, असं त्यांनी सांगितलं. तरुण पिढी नाराज होण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेलं असतानाही तिथे तिसरी लाट आली. आपल्याकडे अजूनही लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जनतेच्या जिवीताची खबरदारी घेणं हे आमचं कामच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्याबाहेर जाऊ नका
अनेक लोक अजूनही गांभीर्याने घेत नाही. कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. अत्यंत महत्त्वाची कामं असतील तरच बाहेर जा. काही लोकं तर पुण्याच्या बाहेर जात आहेत. पुण्याच्या बाहेर जाणाऱ्यांना पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

मुलाचे IIT मुंबईमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक; तब्बल 12.5 लाख गंडावून घेतले

आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी रायगड किल्ल्यावरील प्री-वेडिंग शूटवर कारवाईचे निर्देश

LIVE: १ मे पासून मराठी नाही, परवाना नाही! टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी नियम बदलले.

बिहारमध्ये सम्राटयुग, नव्या मुख्यमंत्रींनी घेतली शपथ, ७५ वर्षांतील भाजपचे पहिले मुख्यमंत्री

पुढील लेख
Show comments