Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैराट फेम कलाकाराची रिक्षावाल्याकडून लूट,फेसबुक वर सांगितली घटना

crime
, शुक्रवार, 15 जुलै 2022 (12:58 IST)
रिक्षा चालकांबाबत आपण अनेक तक्रारी आपण एकल्या असतील बेशिस्त रिक्षा चालक तर आपल्याला मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरात आढळून येतात .असाच एक रिक्षावाल्या सोबत घडलेला प्रकार सैराट फेम सल्या म्हणजेच आसिफ मुल्ला याला आला आहे. त्याने या प्रकाराबाबत फेसबुकवर पोस्ट लीहीली आहे. एवढेच नाही तर त्याने रिक्षा चालकाचे नाव व रिक्षाचा नंबर देखील शेअर केला आहे. सैराट चित्रपटात परशाचा खास मित्र असल्याशि भूमिका साकारणारा सल्या म्हणजेच अरबाज याने याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे अरबाज हा पुण्यात राहतो आणि नांदेड सिटी ते पुणे स्टेशन पर्यंत त्यांनी रिक्षाने प्रवास केला या प्रवासादरम्यान त्याला आलेला वाईट अनुभव त्यांनी फेसबुक वरील पोस्टद्वारे सांगितला आहे त्याचप्रमाणे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अपेक्षा करतो की यंत्रणा यावर मार्ग काढतील असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही असे नाही नांदेड सिटी ते पुणे स्टेशन 198 रुपये होतात मी कधीच ओला उबर रॅपिडो असले ॲप वापरत नाही पाऊस चालू होता मित्राला म्हणून पाऊस चालू आहे कुठे सोडायला येतो आणि परत पावसात ये – जा करतो असे म्हणालो मित्रांनी मला रिक्षा करून दिली पाऊस चालू होता नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली त्याने मला खूप फिरवलं मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो त्यावर तो काही म्हणाला नाही साठ रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली मी म्हणालो का मी त्याला विचारलं असतं त्याने माझ्यासोबत आरेरावी करत शिवी दिली पाऊस चालू आहे.
तू इथेच उतर जास्त बोलू नको मी रोज इथे रिक्षा चालवतो तू नाही साठ रुपये एक्स्ट्रा द्यावे लागेल नाहीतर इथेच उत्तर मी उतरू शकत नव्हतो आणि मला गावी जाण्यासाठी सहा वाजेची ट्रेन होती मी त्याला माझी ओळख सांगितली नाही माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे फेस करावे लागत असेल तर गावावरून फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील त्यांची हे लोक किती लूट करत असतील हे कुठेतरी थांबलं पाहिजे अपेक्षा करतो की यंत्रणा यावर मार्ग काढतील अशी पोस्ट सैराट फिल्म सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख याने फेसबुक वर केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तशृंगी देवी मंदिर सलग 45 दिवस बंद ठेवणे संशयास्पद