Marathi Biodata Maker

गुंड शरद मोहोळची दोन महिन्यासाठी पुणे शहरातून तडीपार

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (07:50 IST)
कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात उपस्थित राहताना आरडाओरडा करीत परिसरात दशहत माजविणाऱ्या  गँगस्टर शरद मोहोळ (रा. सुतारदरा, कोथरूड) याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यासह राहण्यास दोन महिन्यांची मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.
 
गुरूवार पेठ परिसरात 26 जानेवारीला एका संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त गँगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे 10 ते 12 साथीदार आरडाओरडा करीत हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर नागरिक भीतीने पळून गेले होते. कोरोना कालावधीतही नियमांचे पालन न करता मोहोळ टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे त्याच्यासह साथीदारांविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 16 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याला शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यावर दोन महिने सक्त मनाई करण्याचा आदेश 4 मार्चला पारित करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

'विहिरीत अनेक मृतदेह दिसतायेत...'; गावात उडाली खळबळबळ, कौटुंबिक कलह आणि ५ मृत्यूंची धक्कादायक कहाणी समोर

नवरदेवाने परतफेड भेट म्हणून संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले

ठाणे विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित; क्षितीज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

कांदा प्रश्न चिघळला: चांदवडमधील महामोर्च्यात आक्रमक निदर्शने; आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

पुढील लेख
Show comments