Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! पत्नी, सासु सासर्‍याच्या छळाला कंटाळून जावयाची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील घटना

Webdunia
गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (15:59 IST)
पुणे : पत्नीला वेगळे रहायचे असून त्याला सासुसासरे, मेव्हणा हे फुस लावतात़ त्यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरात जावयाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शरद भोसले यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात संशयी पत्नी व तिचे आईवडिल, भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
 
सहकारनगर पोलिसांनी पत्नी प्रियंका शरद भोसले (वय २८), मेव्हणा मनिष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय २७), शंकर शिंदे (वय ५६), रोहिणी शंकर शिंदे (वय ५०, सर्व रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेलीअशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
याप्रकरणी नरेंद्र दत्तात्रय भोसले (वय ५८, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी-dhankawadi)यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शरद आणि प्रियंका यांचे २०१८ मध्ये लग्न झालेहोते. लग्न झाल्यापासून प्रियंकाला वेगळे रहायचे होते. त्यासाठी ती शरद याच्याशी भांडणे करीत व माहेरी निघुन जात असे. माहेरी तिचे आईवडिल तिला फुस लावत असत. प्रियंका शरद याच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याच्याशी भांडणे करीत होती. काही दिवसांपूर्वी शरदचा मेव्हणा मनीष याने त्यांच्यातील भांडणे मिटविण्यासाठी शरद व त्यांच्या वडिलांना मार्केटयार्ड परिसरात बोलावून घेतले होते. तेथे त्याने दोघांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.
 
पत्नीची सातत्याने करीत असलेल्या तक्रारी व माहेरी निघून जाण्याच्या प्रकाराने शरद याने कंटाळून २९ ऑगस्ट रोजी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शरद याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणे व सासु सासरे तिला भडकावितात. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे  अधिक तपास करीत आहेत. गोखलेनगरमधील निखिल शाम धोत्रे (वय २९) या तरुणाने २२ ऑगस्ट रोजी पत्नी व सासु सासरे यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mahindra BE 6e: महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV, फायटर जेटसारखे इंटीरियर, 682 किमी रेंज आणि बरेच काही

पुण्यात भरदिवसा तरुणाची हत्या, धारदार शस्त्राने वार करून खून

LIVE: महाराष्ट्र निवडणुकीबाबत काँग्रेस नेते उद्या निवडणूक आयोगाकडे जाणार

Mahatma Jyotiba Phule Punyatithi 2024 महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती

मुंबई पोलिसांना पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला

पुढील लेख
Show comments