Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू ,एक महिला जखमी

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (15:28 IST)
पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जवळ किणी टोल नाकाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारीची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त मोटारीला मागून एका ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे.
 
याबाबत वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.निलेश कुमार सी (वय ४२), संजना माहेश्वरी (वय २७) जिथ्या त्रिलेश (वय ११, रा. सर्व मीनाक्षीनगर बेंगलोर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात अरींनी एन. (वय ४१, रा. बेंगलोर) या जखमी झाल्या आहेत.
 
अपघातात निलेश कुमार सी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या महिंद्रा मोटारीतून बंगळुरूकडे निघाल्या होत्या. रात्री सव्वा बारा वाजता ते किणी टोल नाक्यापासून पुढे आले. तेथून काही अंतरावर एक कंटेनर उभा होता. त्याच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, बॅरॅकेटेड किंवा टेललाईट याची व्यवस्था केलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर हा कंटेनर उभा केला होता. मोटार चालकास रात्री तो नीट दिसला नाही. मोटार कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. तर मोटारीस मागून आलेल्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून जोरात धडक दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

तुर्कीमध्ये अडकलेले व्हर्जिन अटलांटिकचे विमान 2 दिवसांनी मुंबईत पोहोचले, प्रवाशांनाही एअरलाईनवर आरोप केले

मुंबई: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वेगवान डंपरने पादचाऱ्याला चिरडले, चालकाला अटक

पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात यशस्वी जयस्वालच्या फॉर्मवर लक्ष ठेवले जाईल

आयपीएल फायनलपूर्वी नीरज चोप्रा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परतणार

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना पदावरून काढून टाकण्यात आले

पुढील लेख
Show comments