Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील

Webdunia
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:17 IST)
सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसर्‍या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण खरे सावरकर समजायला अनेक जन्म घवे लागतील, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‌मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्यावतीने गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
 
सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असे सावरकरांनी सांगितल्याने स्वतःला हिंदू म्हणवणारा माणूस सावरकर यांच्यापासून दूर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणे सोपे आहे. पण असे म्हणणार्‍यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रेम केले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. देशाला सावरकरांचे विचारच वाचवू शकतात. हिंदू आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते. सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद मसजणार नाही असे गोखले यांनी सांगितले आहे. 
 
गोखले यांनी यावेळी सावरकरांवर टीका करणार्‍यांना सुना प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. सावरकरांकडूनही काही चुका झाल्या असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण कुणीही उठतो आणि लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करतो हे फार चुकीचे आहे, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 'हिंदू मॅरेज कोड'चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्‍या स्त्रियांनी रोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे असे गोखले यांनी म्हटले आहे. तसेच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉ. आंबेडकरांच ऋणात राहिले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments