Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात भीषण अपघातात आईसह मुलीचा दुर्देवी मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (13:16 IST)
रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून बोलत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक ने दिलेल्या धडक मुळे  झालेल्या अपघातात आईसह मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली आहे. जिजाबाई केरुबाई पळसकर(52) आणि ताराबाई महादू साबळे (73) असे या मयत झालेल्या आई आणि लेकीची नावे आहेत. तर विलास महादू साबळे(47) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

अधिक माहितीनुसार, जखमी विलास साबळे आणि त्यांची आई ताराबाई साबळे हे टाकली हाजी येथून दुचाकीने जात असताना त्यांना त्यांची बहीण जिजाबाई पळसकर या पायी चालताना दिसल्या. विलास यांनी त्यांना पाहून आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि दोघी मायलेकी आपसात बोलत होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक ने तिघांना धडक दिली. या अपघातात ताराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले तर जिजाबाई या गंभीर जखमी झाल्या त्यांना स्थानिकांनी तातडीने शिरूरच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक आपल्या ताब्यात घेतले असून चालकाचा शोध घेत आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments