Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:01 IST)
मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे. त्यामळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
 
गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकामधील असलेल्या मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळते. दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच, दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.
 
अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिराने धावत आहे. शिवाय, लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
file photo

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जालन्यात 390 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त: आयकर विभागाची टीम वराती म्हणून दाखल झाली, कोड वर्ड होता- दुल्हनिया हम ले जायेंगे; 58 कोटींची रोकड सापडली