Festival Posters

क्रिकेट खेळताना दम लागून तरुणाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (15:09 IST)
पुण्यातील  हडपसर परिसरात  मैदानावर क्रिकेट  खेळत असताना दम लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली असून श्रीतेज सचिन घुले (वय 22) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका मैदानावर ही घटना घडली. रविवारी श्रीतेज हा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यानंतर क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान श्रीतेज च्या आकस्मिक निधनाची माहिती मिळतात परिसरात शोककळा पसरली. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले आणि माजी सरपंच श्‍वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर ची घटना, लग्न समारंभात नातेवाईकांनी दरोडा टाकला, ९ लाख रुपयांचे दागिने लंपास

अर्थसंकल्पात, महाराष्ट्र सरकारकडून जुनी वाहने स्क्रॅप करण्यावर मोठी सूट जाहीर

महाराष्ट्रात सक्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्यांना अटक करण्यासाठी विधेयकाला मंजुरी

नागपूर ते उमरेड पर्यंत, बारावी बोर्डाचे पेपरफुटी, कोचिंग संस्थांमधील संगनमत, बोर्डाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

मुंबई विमानतळाजवळ नमाज पठण करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

पुढील लेख
Show comments