Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खंजिराची भाषा करताना सांभाळून बोला - संजय राऊत

Webdunia
गुरूवार, 26 मे 2022 (10:41 IST)
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिला. यावरून मराठा संघटना शिवसेनेवर नाराज झाल्या आहेत.
 
"शिवसेनेने संभाजीराजेंच्या पाठीत खुपसला, अशी टीका मराठा संघटना करत आहेत. याच संघटनांच्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
 
'खंजिराची भाषा नको, बोलताना जरा सांभाळून बोला. आम्ही आमच्या वाटणीची जागा छत्रपतींना देऊ केली होती, आणखी काय करायला हवं होतं?' असा सवाल राऊत यांनी मराठा संघटनांना केला आहे.
 
"आम्ही स्वत: शिवसेनेची एक जागा जी जागा जिंकण्यासाठी 42 मतं लागतात, त्या जागेवर उमेदवार म्हणून छत्रपतींना संधी द्यायला तयार होतो. छत्रपतींनी ती संधी घ्यायला हवी होती.
 
"संभाजीराजेंनी याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांनाही राजकीय पक्षांची मजबुरी काय असते ते माहिती आहे. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये," असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींनी धारावीतील चामडे उद्योगातील कामगारांना भेट दिली

LIVE: राहुल गांधींनी धारावीतील कामगारांना भेट दिली

धक्कदायक : दोन्ही तळव्यांना खिळे ठोकलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

विनेश फोगटच्या घरी एक 'छोटासा पाहुणा' येणार

'माझ्या विधानाबाबत गैरसमज झाला आहे', मराठी वादावर आरएसएस नेते भैयाजी जोशी यांचे स्पष्टीकरण समोर आले

पुढील लेख
Show comments