Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्षाबंधन : धन, आनंद आणि यश प्राप्तीसाठी काही सोपे उपाय

webdunia
पवित्र सण रक्षा बंधन या गोष्टीचं शुभ प्रतीक आहे की नात्यात विश्वास, सन्मान आणि गोडवा टिकून राहावा. या दरम्यान काही विशेष पूजन देखील केलं जातं. देशातील अनेक भागात या दिवशी ग्रह दोष निवारण संबंधी उपाय देखील अमलात आणले जातात. जाणून घ्या या संबंधी काही प्रमुख आणि सोपे उपाय...
 
(1) ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी नीच किंवा शत्रू राशीत किंवा वाईट स्थळ बसलेला असल्यास, काळ्या दगडाच्या चौरस तुकड्यावर खडूने शनी यंत्र तयार करून आपल्या घरावरून 8 वेळा ओवाळून विहिरीत फेकून द्यावं. नंतर 
 
कधीही त्या विहीरीच पाणी पिऊ नये.
 
(2) काचेच्या एका बाटलीत मोहरीचे तेल भरून त्याला काचेच्या झाकणाने बंद करून स्वत:वरून ओवाळून वाहत्या पाण्यात वाहून द्यावे.
 
(3) राहू खराब असल्यास 11 पाणी असलेले नारळ स्वत:वरून ओवाळून वाहत्या पाण्यात वाहून द्यावे.
 
(4) चंद्र खराब असल्यास दुधाने चंद्राला अर्घ्य देऊन तेथे बसून 'ॐ सोमेश्वराय नम:' मंत्राचा यथाशक्ती जप करावा. दुधाचे दान करावे.
 
(5) कालसर्प दोष असणार्‍यांनी सर्प पूजन करावे आणि चांदीच्या डबीत मध भरून एकांत स्थळी दफन करावे.
 
(6) देवी सरस्वती मंत्र 'ॐ ऐं सरस्वत्यै नम:' मंत्राचा स्फटिक माळेने यथाशक्ति जप करावा, लाभ होईल. चंद्र आणि राहूची शांती होईल.
 
(7) शत्रू शांतीसाठी हनुमानाला चोला चढवावा आणि गुळाचा नैवेद्य दाखवून गुलाबाचे फुलं अर्पित करावे.
 
(8) एखाद्या वट वृक्षाखाली येत असलेलं रोप घराच्या कुंड्यात लावावं, असे केल्याने समृद्धी वाढेल.
 
(9) नजर दोष असल्यास तुरटीचा तुकडा दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून ओवाळून चुलीत जाळून द्यावं, दोष दूर होईल.
 
(10) उधारी परत येत नसल्यास कापराने काजळ तयार करावं आणि त्याने एका कागदावर उधारी देत नसलेल्या माणसाचं नाव लिहून वजनी दगडाखाली दाबून द्यावं, लाभ होईल.
 
(11) घरात वारंवार अपघात घडत असल्यास काली किंवा महाकाली यंत्र घरात लपवून स्थापित करावे.
 
(12) विवाह होत नसल्यास किल्ली स्वत:जवळ ठेवून जुना उघडलेला ताळा स्वत:वरून ओवाळून रात्री चौरस्त्यावर फेकून द्यावा, नंतर मागे वळून बघू नये.
 
(13) आजार बरा होत नसल्यास रात्री पत्रावळीवर शिरा ठेवून आजारी व्यक्तीवरून 11 वेळा ओवाळून चौरस्त्यावर ठेवून द्यावं किंवा रात्री एक शिक्का आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवावा. सकाळी स्मशान भूमीवर फेकून द्यावा.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

माहेरवाशीण