Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीरामाचा धांवा Shri Ramacha Dhava

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (10:44 IST)
हे रामसख्या तुज भक्‍तछळण कां साजे ।
 
तव ब्रीद तोडरीं ’राम दयार्णव’ गाजे ॥धृ०॥
 
या कलियुगिं सकलहि दुर्बल हे श्रीरामा ।
 
नच देहशक्‍ति बा मानसीक हि आम्हां ॥
 
जरि इच्छिसि तपहि न होतें आम्हां कडुनी ।
 
झट ज्वरादिकें तनु पीडित थोडें करुनी ॥१॥हे राम-
 
एकाग्र मनहि नच जपध्यानादिकिं होय ।
 
तव प्राप्‍तिस्तव या कोणतीहि नच सोय ॥
 
नच धनधान्य हि बा विपुल असे या आम्हां ।
 
कलिं सकल दृष्टीनें हीन भक्‍त बहु रामा ॥२॥हे राम-
 
असहाय बालका देखुनि माता धावे ।
 
मम भक्‍त म्हणुनिया त्वरितचि आम्हां पावे ॥
 
तूं देव त्रयाचा चालक पालक अससीं ।
 
जगिं अघटित करण्या शक्य असुनिया तुजसी ॥३॥हे राम-
 
या कलिकालाचे निमित्त पुढती करुनी ।
 
नच फसवी आम्हां भोळे भाविक म्हणुनी ॥
 
असहाय निरंकुश वीर श्रेष्ठ तूं होसी ।
 
तव सम न शक्‍त बा कोणिहि गोचर मजसी ॥४॥हे राम-
 
तव विरह व्यथेनें बहुत दुःख या होई ।
 
चिर दुःखित आम्हां झडकरि दर्शन देई ॥
 
तव दासाम आम्हां विघ्न कायसें रामा ।
 
तव उदासीनता कारण या सुखधामा ॥५॥हे राम-
 
मी निर्गुण निष्क्रिय अरुप म्हणुनि न राहे ।
 
नित स्थूल कार्य जगिं स्थूलचि रुपें बाहें ॥
 
बहु भक्‍तां दर्शन देऊनि पावन केलें ।
 
आतांचि असें कां मौन जाडय बा धरिलें ॥६॥हे राम-
 
तव परम प्रीतिचा आर्यधर्म हा आतां ।
 
जगिं लुप्‍त प्राय बा होत कुणि न या त्राता ॥
 
कितीकांच्या मानी सुर्‍या पडति कितिकांच्या ।
 
निजधर्मासाठीं पाठीं पोटिं भोळ्यांच्या ॥७॥हे राम-
 
किति पादत्राणें कुंकुमसतिचें पुसुनी ।
 
सति पुढति पतीचा खून बहू छळ करुनी ॥
 
नव युवति कुमारिहि तदीय हे रघुनाथा ।
 
किति भ्रष्ट करुनि मग केल्या भ्रष्ट सुमाता ॥८॥हे राम-
 
किति असति बिघडल्या सति पति मज ना गणती ।
 
किति अंगावरचीं पोरें पयाविण रडती ॥
 
मायबापाविण बा कितिक बालके दीन ।
 
किति त्यक्‍त-ग्रामगृह विदेशी धनकणहीन ॥९॥हे राम-
 
हे कितिक सुधार्मिक कुलीन बळजबरीनें ।
 
परधर्माचें जूं वागवीति भीतीनें ॥
 
त्या दुष्टांच्या करि हताश होउनि रामा ।
 
अति करुण अश्रुनें बाहति तुज सुखधामा ॥१०॥हे राम-
 
किति कोमल कुलिना बाल बालिका युवती ।
 
किति पतिव्रता सति यवनांच्या दुर्नीतीं ॥
 
बहु नीच छळण बा सोसुनि मनिं कढताती ।
 
मग निराशतेच्या दीर्घश्‍वासिं तुज बाहती ॥११॥हे राम-
 
कुणि दिव्य शक्‍तिचा साधु वा संन्यासी ।
 
अभिमान बाळगुनि सोडवील आम्हांसी ॥
 
हे दीन हिंदुजन आशा करिती रामा ।
 
आम्हांसि तरी दे योग्य शक्‍ति सुखधामा ॥१२॥हे राम-
 
मज ऐकवेन हे नयनातुनि जल वाहे ।
 
बहु हृदयि पीळ बा पडुनी प्रार्थित आहे ॥
 
झणिं धाव पाव बा धर्माच्या अभिमानें ।
 
जरि ना तरी दे बळ आम्हां या करुणेनें ॥१३॥हे राम-
 
बहु नियम वर्तवुनि धर्म मालवूं बघती ।
 
सामान्य जनहि हे ’धर्मशल्य हा’ म्हणती ॥
 
बहु अनीतिसी बा ऊत आलासे जगतीं ।
 
अवतार घेई जरि ना, दे शक्‍ति आम्हां ती ॥१४॥हे राम-
 
हा धर्म सनातन महत्त्व परि याचें हें ।
 
जगिं नेणुनि सकल हि अंध जाहले पाहे ॥
 
या धर्माचें बा महत्व वठवुनी दावी ।
 
स्वतःची ना तरी करवी आम्हां करवीं ॥१५॥हे राम-
 
झणिं देह धरुनि क्षणिं वाढुनिया सुखधामा ।
 
हा अधर्म हाहाःकार शान्तवी रामा ॥
 
हा आवडीचा तव धर्म आतां नच राहे ।
 
जरि वेळ लाविसि म्हणवुनि तुज बहु बाहे ॥१६॥हे राम-
 
हे रामसख्या तुज भक्‍तछळण कां साजे ।
 
तव ब्रीद तोडरीं ’रामदयार्णव’ गाजे ॥धृ०॥हे राम-
 
रचनाकार - श्रीधरस्वामी महाराज

संबंधित माहिती

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

पुढील लेख
Show comments